सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील विज्ञान शिक्षक रतीलाल बाबेल यांच्या कविता मुलद्रव्याची या पुस्तकाच...
सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील विज्ञान शिक्षक रतीलाल बाबेल यांच्या कविता मुलद्रव्याची या पुस्तकाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (India Book of Records) नोंद घेण्यात आली आहे. हा बहुमान आई श्रीमती गुलाबबाई बाबेल व विज्ञान प्रेमी यांना समर्पित करत असल्याचे रतीलाल बाबेल यांनी सांगितले.
मूलद्रव्यांचे सजीवांच्या दैनंदिन जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा 118 मूलद्रव्यांची माहिती व महत्त्व सहज लक्षात ठेवणे कठीण आहे परंतु सजीवांना उपयुक्त ठरणाऱ्या मूलद्रव्यांची माहिती विद्यार्थी व शिक्षकांपर्यंत सहज व सोप्या पद्धतीने कशी पोहोचवता येईल यासाठी रतीलाल बाबेल यांनी कविता मुलद्रव्याची या पुस्तकांमधून तब्बल 33 मूलद्रव्यांची माहिती कवितेच्या स्वरूपात सोप्या पद्धतीने मांडली असून ही माहिती विद्यार्थी शिक्षक व विज्ञानप्रेमी यांच्यासाठी निश्चित उपयुक्त आहे. म्हणूनच कविता मूलद्रव्याची या पुस्तकाची दखल जॅकी बुक ऑफ वर्ल्ड पाठोपाठ इंडिया बुक ऑफ वर्ल्ड व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस ने घेतली आहे.
मुलद्रव्यांवर अशा प्रकारे कवितेच्या माध्यमातून माहिती प्रसारित करण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम असावा असे मत जी एम आर टी एन सी आर ए पुणे चे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जे.के. सोळंकी व युवा शास्त्रज्ञ विकास काशिद यांनी व्यक्त केले.
या रेकॉर्डसाठी पत्नी अक्षदा बाबेल, दिलीप लोंढे, जी एम आर टी एन सी आर ए चे वरिष्ठ अधिकारी जे. के.सोळंकी,एन. सी.आर. ए. पुणे चे केंद्र संचालक डॉक्टर यशवंत गुप्ता, विज्ञान संघाचे सल्लागार वल्लभ शेळके सर तसेच विज्ञान अध्यापक संघ सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले असल्याचे रतिलाल बाबेल यांनी सांगितले.
:>विद्यार्थ्यांना व विज्ञान प्रेमींना मूलद्रव्यांची माहिती सहज व सोप्या भाषेत उपलब्ध व्हावी व ती कायमस्वरूपी लक्षात राहावी यासाठी "कविता मूलद्रव्यांची" हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला त्यांची दखल समाजातील सर्वच घटकांना बरोबर भारतीय रेकॉर्ड बुकने व जॅकी बुक ऑफ वर्ड यांनी दखल घेतली याचा खूप आनंद होत आहे.-
रतिलाल बाबेल
COMMENTS