सहसंपादक : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन व समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स,कॉलेज ऑफ इंज...
सहसंपादक : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन व समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,बेल्हे(बांगरवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने बेल्हे येथील समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकतीच राष्ट्रीय संशोधन परिषद २०२२(NCIRST-2022) पार पडली.
या परिषदेचे उदघाटन संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले.
बँगलोर येथील सायबर सेना इंडिया प्रा.लि.चे डॉ.दिनेशा या परिषदेसाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
नवनिर्मितीचा ध्यास हाच खरा संशोधनाचा मूलमंत्र असून संशोधनाद्वारे नवनिर्मितीला चालना मिळते असे उपस्थितांना संबोधित करताना डॉ.दिनेशा म्हणाले.
विविध क्षेत्रातील संशोधनाचे काम करण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सायबर सुरक्षा की जो आपल्या सर्वांच्या अगदी घरातील विषय बनलेला आहे.संशोधनातील सायबर सुरक्षिततेचे महत्व तसेच संशोधनातील बारकावे हे समजून घेतले पाहिजे तरच आपल्याला अपेक्षित यश मिळू शकेल असे डॉ.दिनेशा यांनी सांगितले.
या परिषदेमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,मेकॅनिकल इंजिनिअरिंग तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग आदी विभागांतून ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत पेपरद्वारे संशोधन सादरीकरण केले.महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अनेक संशोधकांनी त्यांनी केलेल्या संशोधन व पेपर ची माहिती दिली.सदरची राष्ट्रीय परिषद ही इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन च्या माध्यमातून आयोजित करण्यात आल्याचे परिषदेचे समन्वयक प्रा.भूषण बोऱ्हाडे यांनी सांगितले.तसेच यामधील निवडक संशोधन पेपर हे आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी दिली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
सदर परिषदेसाठी अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,एम बी ए चे प्राचार्य प्रा.राजीव सावंत,डॉ.महेश भास्कर,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,डॉ.सुभाष कुंभार,गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे,लॉ कॉलेज चे प्राचार्य प्रा. पानमंद,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,नॅक समन्वयक डॉ.संदीप नेहे,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.अमोल भोर,ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन पोखरकर,रा से यो अधिकारी प्रा.विपुल नवले तसेच सर्व विभागप्रमुख,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके यांनी अशा प्रकारच्या परिषदेमुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांचे संशोधन कौशल्य विकसित होत असल्याचे सांगितले व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या परिषदेचे सूत्रसंचालन कु.आरती झावरे हिने प्रास्ताविक प्रा.भूषण बोऱ्हाडे यांनी तर आभार प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी मानले.
COMMENTS