पुणेः सणसवाडी (ता. शिरुर) येथे नातेवाईकांकडे आलेल्या महिलेचा एकाने मी धनंजय मुंढेंचा माणूस आहे, असे म्हणून अश्लील शिवीगाळ करत विनयभंग केल्या...
पुणेः सणसवाडी (ता. शिरुर) येथे नातेवाईकांकडे आलेल्या महिलेचा एकाने मी धनंजय मुंढेंचा माणूस आहे, असे म्हणून अश्लील शिवीगाळ करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिसांनी अतुल शिवाजीराव वेदपाठक याच्यावर गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे.
सणसवाडी येथील नातेवाईकांकडे महिला आली होती. सदर महिला सणसवाडी चौकामध्ये आपल्या नातेवाईकांची वाट पाहत उभी असताना अतुल वेदपाठक हा महिलेच्या जवळ आला आणि महिलेला धक्का दिला. यावेळी महिला महिला जाब विचारात असताना त्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करत मी धनंजय मुंढेंचा माणूस आहे, तुला महिन्याने ठेवतो असे म्हणत महिलेच्या अंगाला स्पर्श करत महिलेचा विनयभंग केला.
दरम्यान, महिलेचे नातेवाईक सदर ठिकाणी आले त्यांनी काही नागरिकांच्या मदतीने सदर व्यक्तीला पकडून शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे आणले. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादी वरुन शिक्रापूर पोलिसांनी अतुल शिवाजीराव वेदपाठक (वय ४३ वर्षे रा. पद्मावती वस्ती व्यंकटेश कारखान्याजवळ जातेगाव ता. शिरुर जि. पुणे) याच्यावर गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस नाईक किरण निकम करत आहेत.
COMMENTS