क्राईमनामा Live : गेल्या अनेक दिवसापासून हनी ट्रॅपचे प्रकार सातारा जिल्हात घडत आहेत. दरम्यान, वाई तालुक्यातील एका शिपायाकडून एका व्यक्तीच्या...
क्राईमनामा Live : गेल्या अनेक दिवसापासून हनी ट्रॅपचे प्रकार सातारा जिल्हात घडत आहेत. दरम्यान, वाई तालुक्यातील एका शिपायाकडून एका व्यक्तीच्या पत्नीला अश्लिल SMS पाठवण्यात आला आहे.
या प्रकारामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वाई पोलिसांकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यात राहणाऱ्या पूनम हेमंत मोरे (वय 30) व हेमंत विजय मोरे (वय 31) मूळ रा. ओझर्डे सध्या (रा. कुडाळ, ता. जावली) यांनी सुरुवातीला शिवशक्ती पतसंस्था शिपाई जितेंद्र सोपान जाधव (वय 30) रा. बोपेगाव यांच्याशी जवळीक साधली. यावेळी तुमच्या बँकेत नोकरी मिळेल का? असे विचारून पूनम हिने जितेंद्र यांचा नंबर घेतला. यानंतर पूनम मोरे हिचे जितेंद्रला नियमित मेसेज येऊ लागले. एकमेकांशी संवाद साधल्यानंतर कालांतराने दोघांच्यात भेटीगाठी वाढू लागल्या. या दरम्यान जितेंद्रला मात्र, आपल्या विरोधात फसवणुकीचे एक प्रकारे षडयंत्रच रचले जात आहे याची काडीमात्र कल्पना नव्हती.
एक दिवस बावधन नाका येथील हॉटेलवर दोघांची भेटही झाली. भेटीनंतर प्रकरण इतके पुढे गेले की, यानंतर दोघांमध्ये अश्लीष मेसेज येऊ लागले. दोघांच्यातील मेसेजवरून पूनम मोरे हिचा पती हेमंत याने आपल्या पत्नीला अश्लीष मेसेज पाठवत असल्याबद्दल बँकेत, घरी सर्व सांगून बदनामी करेन अशी जितेंद्र याला धमकी दिली. तसेच पैशांची मागणीही केली. पैशांच्या मागणीनंतर जितेंद्रने हेमंतला तब्बल 2 लाख 89 हजार 500 रुपये दिले. पैसे दिल्यानंतर दोघांच्याकडून आणखी पैशांची मागणी होऊ लागली.
पैशांची मागणी वाढू लागल्यानंतर अखेर जितेंद्र याने वाई पोलीस ठाण्यात दोघांविरोधात रीतसर तक्रार दाखल केली. जितेंद्रच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची वाई पोलिसांनी सखोल चौकशी केली असता दोघांच्या विरोधात अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ दोघा जणांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे ,सातारा, उप विभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे, उपनिरीक्षक विजय शिर्के, महीला पोलीस नाईक सोनाली माने, पो. कॉ. किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अमित गोळे, प्रसाद दुदुस्कर यांनी सहभाग घेतला होता.
COMMENTS