आरोग्य टिप्स : १.पित्ताच्या समस्येवर गुणकारी- पित्ताच्या त्रासावर आवळा अतिशय गुणकारी आहे. पित्ताचा त्रास असेल तर नियमितपणे आवळा कॅण्डी, आवळ...
आरोग्य टिप्स :
१.पित्ताच्या समस्येवर गुणकारी-
पित्ताच्या त्रासावर आवळा अतिशय गुणकारी आहे. पित्ताचा त्रास असेल तर नियमितपणे आवळा कॅण्डी, आवळा सुपारी किंवा आवळा ज्यूस घ्यावा.
२.अशक्तपणा, मधुमेह, पोटाचा त्रास यावर गुणकारी-
अशक्तपणा, मधुमेह, पोटाचा त्रास असणाऱ्यांनी नियमित आवळा खावा.आवळ्याच्या नियमित सेवनाने रक्तातली साखरेची पातळी मर्यादेत राहते. त्यामुळे मधुमेहाचा त्रास थोड्या प्रमाणात कमी होतो.
३.स्मरणशक्ती सुधारते-
आवळ्यामुळे स्मरणशक्ती वाढते.
४.शरीराची उष्णता कमी होते-
शरीराची उष्णता कमी करण्यासाठी आवळा उपयोगी आहे.
५.ह्रदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक-
नियमितपणे आवळ्याचे सेवन केल्याने कॉलेस्टॉरॉल कमी तयार होते आणि ह्रदय निरोगी राहते.
६.रक्तवाहिन्या मजबूत होतात-
एक आवळा रोज खाल्ल्याने रक्तवाहिन्या मजबूत होतात.
७.शरीराला ऊर्जा मिळते-
शरीर सुस्त राहत असेल, तर आवळ्याच्या सेवनाने रक्त संचारात गती येते.
८.सर्दी-पडस्यावर गुणकारी-
नेहमीच सर्दी पडसे होत असेल तर २ चमचे आवळ्याचा रस आणि २ चमचे मध रोज सकाळी नियमित एकत्र करून घेतल्यास अराम मिळतो.
९.नेहमी तरुण दिसता-
आवळ्यात अँटी ऑक्सीडंटस मोठ्या प्रमाणात असतात. आवळा शरीरातील पेशींचे आयुष्य वाढवण्याचे कार्य आणि फ्री रेडिकल कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे तारुण्य टिकून राहते.
१०.हिरड्या मजबूत होतात
नियमित एक कच्चा आवळा खाल्ल्याने हिरड्या मजबूत होतात.
COMMENTS